Job! Job!! Job!!!
MS-CIT व KLiC च्या विद्यार्थ्यांसाठी खास प्लेसमेंट सुविधा
आपण जर जॉब साठी इच्छूक असाल आणि आपण MS-CIT व क्लिक कोर्स केला असेल तर खालील लिंकला भेटद्या आणि अधिक माहिती घेऊन आपला अर्ज दाखल करा.
लिंक : https://www.help.mkclmantra.com/jobaspirant
Category: Designs
Designs for MKCL ALCs Centers
-
Job! Job!! Job!!!
-




-
Happy New Year

Job ready career purpose BBA
-

MOM Challenge
MOM म्हणजेच MKCL Olympiad Movement!
५वी ते ९ वी तील SSC बोर्डच्या मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांच्या विविधांगी शैक्षणिक गुणवत्तेला आव्हान देणारी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा असेल.
शालेय विषयांसोबतच विद्यार्थ्यांमध्ये मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगात आणण्याची क्षमता किती प्रमाणात आहे आणि एका विषयामध्ये मिळवलेल्या माहितीचा, ज्ञानाचा दुसरा विषय समजून घेताना तिला/त्याला उपयोग करता येतो का हे समजून घेणे MOM मुळे सहज शक्य होणार आहे.
याच बरोबर प्रश्न सोडवत सोडवत अध्ययन (Learning through Assessment) करण्याची संधीसुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
त्यांच्या बुद्धीला चालना देणारे आव्हानात्मक प्रश्न आणि तितकेच नवनवीन प्रश्न प्रकार येथे विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळणार आहेत.
visit : http://ww3.mkcl.org/mom
#Mom #talent #challenge #school #competitive #olimpiyad #ntse #mtse #search #scholor #exam #quiz #prize #mkcl #mscit #
-
MOM Challenge
MKCL Olympiad Movement (MOM)
जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, Soft skills अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) गरजेची असतात. ५वी ते ९वी तील SSC बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी ‘MKCL ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा नोव्हेंबर २०२१ अर्थात ‘MOM’ ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेतील प्रश्नप्रकार आणि प्रश्नांचे स्वरूप हे जागतिक पातळीवरील मानकांनुसार तयार केले गेले आहेत. या स्पर्धा परीक्षेतील विजयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर काही लाखांची परितोषिकेही दिले जाणार आहेत.


-
Mahatma Gandhi Jayanti – E Test
महात्मा गांधी जयंती प्रश्नमंजुषा २०२१ 🧾🧾🎯🎯
महात्मा गांधी जयंती निमित्त सर्वांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व LLC Aurangabad तर्फे हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
या वर्षीची महात्मा गांधी जयंती डिजिटल माध्यमातून साजरा करण्यासाठी LLC Aurangabad च्या वतीने सर्वांसाठी एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा (eTest) आयोजित करीत आहोत.
eTest देण्याकरिता https://www.help.mkclmantra.com/quiz या लिंकला भेट द्या.
eTest दिल्यानंतर आपणास एक आकर्षक प्रमाणपत्र ही प्राप्त होईल,
ही eTest जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना याचा लाभ होईल. -

Live Link – Tilimili : DD Sahyadri TV Serial
Tilimili on mobile
आता आपण आपली आवडती टिली-मिलि मालिका दूरदर्शन च्या सह्याद्रि वाहिनी द्वारे आपल्या मोबाईलवर सुधा बघू शकता
-

Tili-Mili – TV Serial for School Student
शालेय विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान
कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या. त्या अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी राहिलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे कधी व कशा सुरू होऊ शकतील यासंबंधी अनिश्चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध माध्यमे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यामध्येच डी.डी. सह्याद्री वाहिनीद्वारे ”ज्ञानगंगा” या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण दिनांक १४ जून २०२१ पासून दैनिक ५ तासांकरीता सुरु करण्यात आले आले. शासनाच्या याच उपक्रमाला सहयोग देण्यासाठी ,व अशा अपवादात्मक परिस्थितीत ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे पुनर्प्रक्षेपण मोफत देण्याचे ठरविले आहे.
मागील शैक्षणिक वर्षात “टिलीमिली” ही मालिका विद्यार्थ्यान मध्ये अत्यंत लोकप्रिय झाली. आपल्या राज्यात सर्वदूर राहणाऱ्या सुमारे दीड कोटी ‘टिलींना व मिलींना’ अर्थात मुलामुलींना त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर या नि:शुल्क सेवेचा लाभ घेतला तसा याही वर्षी घेता येईल. ही मालिका त्यांच्या पालकांनीही मुलांसोबत जरूर बघावी व त्यात सुचवलेले उपक्रम त्याच दिवशी मुलांबरोबर घरी व परिसरात करून शिकावे.
“टिलीमिली” ही मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित आहे. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत. मुलांना घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव घेऊ दिले गेले आहेत, त्यांच्याभोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाईल, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता असेल व चुका करत स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. असे केल्याने मुले हसत-खेळत स्वत:च कशी शिकतात हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल. अशी सहज, आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने मुलांना ही मालिका रोज स्वत: शिकण्याची स्फूर्ती देईल, त्यांचा आत्मविश्वास वाढवेल व शिकायचे कसे हे शिकवेल.
‘वाडीवस्ती-शिक्षण’, ‘कॉलनी-शिक्षण’ किंवा ‘मोहल्ला-तालिम’ देणारे ‘ज्ञानरचना सुलभक’
जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही व अभ्यासू मावशी व काका स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात व आपल्या कॉलनीतल्या, वाडीतल्या, वस्तीतल्या किंवा शेजारच्या एकेक दोन-दोन मुलांच्या गटांना ज्ञानरचना करायला रोज आपल्या घरी कशी मदत करू शकतात हेही “टिलीमिली” मालिका जाताजाता दाखवले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ‘वाडीवस्ती-शिक्षण’, ‘कॉलनी-शिक्षण’ किंवा ‘मोहल्ला-तालिम’ देणारे ‘ज्ञानरचना सुलभक’ राज्यात यंदाही पुढे यावेत अशी अपेक्षा आहे.
पहिली ते आठवी च्या प्रथम सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित दररोज १० एपिसोड्स यानुसार प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील.
आठही इयत्तांचे मिळून पहिल्या सत्रातील ४८० एपिसोड्स असलेली ही महामालिका मंगळवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू होईल.
सामान्यत: कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाव्यतिरिक्त पण मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल.
दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:
प्रत्येक सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागांचे वेळापत्रक :
वेळ इयत्ता सकाळी ९.०० ते ९.३० पहिली सकाळी ९.३० ते १०.०० दुसरी सकाळी १०.०० ते १०.३० तिसरी सकाळी १०.३० ते ११.०० चौथी सकाळी ११.०० ते ११.३० DD चे अन्य कार्यक्रम सकाळी ११.३० ते १२.०० पाचवी दुपारी १२.०० ते २.०० DD चे अन्य कार्यक्रम दुपारी २.०० ते २.३० सहावी दुपारी २.३० ते ३.०० सातवी दुपारी ३.०० ते ३.३० सातवी दुपारी ३.३० ते ४.०० आठवी दुपारी ४.०० ते ४.३० आठवी मंगळवार ते शुक्रवार प्रसारित होणाऱ्या भागांचे वेळापत्रक :
वेळ इयत्ता सकाळी ९.०० ते ९.३० पहिली सकाळी ९.३० ते १०.०० दुसरी सकाळी १०.०० ते १०.३० तिसरी सकाळी १०.३० ते ११.०० चौथी सकाळी ११.०० ते १.३० DD चे अन्य कार्यक्रम सकाळी १.३० ते २.०० पाचवी दुपारी २.०० ते २.३० सहावी दुपारी २.३० ते ३.०० सातवी दुपारी ३.०० ते ३.३० सातवी दुपारी ३.३० ते ४.०० आठवी दुपारी ४.०० ते ४.३० आठवी दूरदर्शन च्या ‘सह्याद्री’ वाहिनी वरील ही महामालिका टाटा स्काय वर १२७४, एअरटेल वर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व एमकेसीएल परिवारा तर्फे प्रसारित होणार्या “टिलीमिली” या महामालिकेची माहिती आपण आपल्या परिसारातील पहिली ते आठवी इयत्तेतील सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापकांन पर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती.
-

Marathwada Libreation Day E-test
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ई प्रश्नमंजुषा
या टेस्टच्या माध्यमातून आपल्या भारतीय स्वातंत्र्यानंतरसुद्धा गुलामीत असलेल्या मराठवाड्याला निजामाच्या अत्याचारातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळून आपल्या ज्ञानात भर पडणार हे नक्की आणि हाच त्यांच्यासाठी मानाचा मुजरा असेल,
शिवाय आपणास मिळेल ई सहभाग प्रमाणपत्र आपल्या मेलवर.खालील संकेतस्थळावर टेस्ट उपलब्ध आहे…
चला तर मग 17 सप्टेंबरच्या आत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही टेस्ट
पोहोचवून देशसेवा करूया…जय हिंद… 💐
marathwada_Liberation_Day #marathwada #hayderabad #test #quiz #certificate #etest #मराठवाडामुक्तिसंग्राम_दिन #मराठवाडा #हैदराबाद #औरंगाबाद

