Tag: practice

  • S4 – Formula to Success | यशाचा एस 4 फॉर्म्युला |(Mantra for Success)

    S4 – Formula to Success | यशाचा एस 4 फॉर्म्युला |(Mantra for Success)

    प्रिय मित्रांनो,

    आपण आता परीक्षेच्या तयारीच्या महत्वाच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहात. म्हणून आज, मी आपल्याला अत्यंत उपयोगी असा यशाचा कान मंत्र देणार आहे म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं झाल तर. परीक्षेतील यशाचा फॉर्म्युला देणार आहे. माझ्या फॉर्म्युलाचे नाव आहे यशाचा एस 4 फॉर्म्युला. कारण मी आपल्याला ४ स (s) बद्दल सांगणार आहे. या ४ स (s) सोबत तुम्ही गट्टी केली म्हणजे तुम्हाला परीक्षेचा ताण न वाटता त्यात मजा यायला लागेल. हो मित्रानो, परीक्षा ही एक मजा अनुभवण्याची घटना आहे.

    चला तर बघूया ४ स (s) :

    पहिला स (s) :

    स (S) = सराव :

    कुठल्याही परीक्षेच्या वेळेला तुम्ही अभ्यास करता ह्यात काही विशेष नाही. परंतु परीक्षा जवळ आल्यावर आपल्याला आपला मागचा अभ्यास विसरायला होतच नाही का? मग तोच अभ्यास विसरायला लागू नये म्हणून आपण योग्य वेळी सराव करायला हवा. योग्य तितका सराव हा करायलाच हवा. शिवाय हा सराव करताना अगदी जणू काही खरी परीक्षाच देत आहोत या पद्धतीने करायला हवा.

    या सरावाच्या अनेक पद्धती आज उपलब्ध आहे त्यातील काही मी सुचवतो:

    · जुन्या प्रश्न पत्रिका सोडवणे :

    आपण अगदी पारंपारिक रिती नुसार म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशी एक पद्धत सरावासाठी वापरतो ती म्हणजे जुन्या प्रश्न पत्रिका सोडवणे. ही पद्धत अतिशय योग्य आहे. ही सोपी व शास्त्रशुद्ध पद्धत म्हणून वापरता येते. या पद्धतीमुळे आपल्याला प्रश्न प्रकार, प्रश्नाचे आदर्श उत्तर मिळते. त्यात वापरायला हवी असलेली उत्तर लेखनाची भाषा याचा योग्य आणि पुरेसा सराव होतो. शिवाय, या पद्धतीमध्ये आपण वेळ लावून प्रश्न पत्रिका सोडवली तर आपल्याला वेळचे नियोजन करायला सोपे जाते. तसेच, आपली क्षमता तपासणी ही आपसूक घडतेच.

    · पाठांतर :

    पाठांतर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यात आपण नेहमी वापरतो ती म्हणजे पुस्तक वाचन करणे आणि नंतर पुस्तक बंद करून आठवते का ते पाहणे. या पद्धतीमध्ये अनेक वेळा आपल्याला पाठांतर ही गोष्ट कंटाळवाणी वाटते आणि आपण सोडून देतो. म्हणून आणखी एक पद्धत मी आपल्याला सुचवेल ती म्हणजे मोबाईलचा वापर. आता आपल्याला वाटेल मोबाईल चा आणि पाठांतर चा काय संबंध. पण या मोबाईल मध्ये Voice Recorder नावाचे App असते. त्यात आपण आपला आवाज रेकॉर्ड करून नंतर हवा त्यावेळी ऐकू शकतो. म्हणजे आपण एकदा वाचन करून, जेव्हा शक्य होईल तेव्हा फक्त हेडफोन लावा. गाणे ऐकतो तसे आपला अभ्यास ऐका. त्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही. तसेच अभ्यास सुद्धा होतो.

    · सहवाचन / सोबत अभ्यास :

    या पद्धती मध्ये आपण आपल्या गुप मधील सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येऊन खेळ खेळल्या प्रमाणे अभ्यास एकत्र करायचा. यात एकाने जोराने वाचन करावे आणि दुसऱ्याने ऐकावे. ज्यामुळे आपल्या कानावर अभ्यास येईल. शिवाय, एखादा भाग नाही कळाला तर ज्याला कळला तो त्याचे स्पष्टीकरण देऊ शकतो. यात मजा वाढवण्यासाठी आपण प्रश्नोत्तरे, वाद-विवाद, निबंध – पत्र लेखन अशा छोट्या स्पर्धा घेऊ शकतो. त्यात आपल्याला आपणच छोटे बक्षिसे देऊ शकतो.( लवकरच असा खेळ Online आणण्याचा माझा प्रयत्न आहेच).

    · सहजता :

    आपल्या सरावात आपण अत्यंत महत्वाची गोष्ट करणे गरजेची आहे ती म्हणजे आपल्या अभ्यासातील आपल्या क्षमते नुसार प्रश्नांचा अग्रक्रम ठरवणे. आपल्याला हव्या असलेल्या ठराविक मार्क नुसार विषयांचा अग्रक्रम ठरवावा. त्यातील काठीण्य पातळी ओळखून प्रश्नांची विभागणी करावी. त्या विषयी कमी अधिक प्रमाणात सरावाला प्राधान्य द्यावे.

    दुसरा स (s) :

    स (S) = सातत्य :

    आपण अभ्यास करतो त्याचा सराव करावा. आपण त्याच्या पद्धती बघितल्या त्याचा अवलंब करायला लागलो. त्यामुळे झालो पास असे नुसते होणार नाही. तुम्हाला ती गोष्ट परत परत करावी लागेल. म्हणजेच त्यात सातत्य असणे गरजेचे आहे. उदा. तुम्ही आज भरपेट जेवण केले आणि उद्या नाही केले असे चालेल का ? नाही न. आपल्याला सातत्य पूर्ण अभ्यास करावा लागेल. त्याचा सराव सतत करावा लागेल. म्हणजे आपल्याला ते पक्के लक्षात राहील. परीक्षेच्या वेळेत आपण ते कदापि विसरणार नाही.

    तिसरा स (s) :

    स (S) = समजणे :

    आपण बघितले कि अभ्यास आणि सराव ही सातत्य पूर्वक करायची गोष्ट आहे ते एकदा करून सोडून देता येणार नाही परंतु तुम्ही आज अभ्यास केला त्याचा सराव सुद्धा छान चालू आहे आणि तुम्हाला त्याबद्दल पुरेसे ज्ञान मात्र नसेल तर, म्हणजे अभ्यास आपल्या पक्का लक्षात राहणे किंवा पाठ होणे शिवाय आपल्याला तो वेळेत आठवून आपण आपली प्रश्न पत्रिका बिनचूक सोडवणे यात आणि आपल्याला अभ्यास समजणे यात बरेच अंतर आहे कसे ते बघू :

    तुम्हाला 5 आणि 10 ची बेरीज करायला सांगितली तर उत्तर सोप्प आहे. 5+10=15 हे तुम्ही एक सेकंदात सांगू शकता, हो ना? कारण तुम्हाला बेरीज कशी करायची हे समजले आहे म्हणून उदा. 5 ऐवजी 7 घेतले तर उत्तर 17 येणार हे तुम्ही बेरीज करून सांगू शकता. कारण तुम्ही 5+10=15 हे पाठ केलेले नव्हते. त्या मागे असलेली बेरीज ही संकल्पना तुम्हाला नीट समजली होती. म्हणजे गणित सारख्या काही विशेष विषयात आपल्याला त्यात वापरलेल्या संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. एकदा ती संकल्पना तुम्हाला कळली कि तुम्ही कुठलही गणित अगदी सहज सोडवू शकता.

    चौथा स (s) :

    स (S) = समाधान :

    आपल्याला अभ्यास करायला आवडायला लागलंय. त्याचा सराव सुद्धा छान चालू आहे. त्या मध्ये सातत्य ठेवून आपण त्यातील संकल्पना नीट समजून घेण्याचा प्रयत्न देखील करत आहात. पण अत्यंत महत्वाचे म्हणजे आपल्या सर्व शंकांचे योग्य समाधान होणे गरजेचे आहे. तसे होत नसेल, तर आपण आपल्या मित्र, पालक किंवा शिक्षकांच्या मदतीने त्याचे समाधान शोधायला हवे.

    दुसरे महत्वाचे म्हणजे आपण नेहमी समाधानी राहून आपल्या क्षमता आणि आपली मेहनत या प्रमाणे मिळणाऱ्या परिणामावर खुश राहायला हवे. त्यातून नाराज होता कामा नये. त्याचा आपल्या अभ्यासावर विनाकरण वाईट परिणाम दिसू शकतो.

    मित्रांनो मला खात्री आहे कि या एस 4 फॉर्म्युलाचा वापर करून आपण परीक्षेचा अभ्यास केला तर आपण नक्की यशस्वी व्हाल. आपण खूप चांगला अभ्यास करा. यशोशिखरावर आपला नगारा वाजू द्या.

    लवकरच आपल्याशी पुन्हा एकदा परीक्षेतील ताण नियोजन विषयावर बोलेल…

  • Marathwada Libreation Day E-test

    Marathwada Libreation Day E-test

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ई प्रश्नमंजुषा

    या टेस्टच्या माध्यमातून आपल्या भारतीय स्वातंत्र्यानंतरसुद्धा गुलामीत असलेल्या मराठवाड्याला निजामाच्या अत्याचारातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळून आपल्या ज्ञानात भर पडणार हे नक्की आणि हाच त्यांच्यासाठी मानाचा मुजरा असेल,
    शिवाय आपणास मिळेल ई सहभाग प्रमाणपत्र आपल्या मेलवर.

    खालील संकेतस्थळावर टेस्ट उपलब्ध आहे…

    help.mkclmantra.com/quiz

    चला तर मग 17 सप्टेंबरच्या आत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही टेस्ट
    पोहोचवून देशसेवा करूया…

    जय हिंद… 💐

    marathwada_Liberation_Day #marathwada #hayderabad #test #quiz #certificate #etest #मराठवाडामुक्तिसंग्राम_दिन #मराठवाडा #हैदराबाद #औरंगाबाद

  • आता आपले आवडते कॉम्प्युटर कोर्सेस, जवळच्या MS-CIT केंद्रातजवळच्या MS-CIT केंद्रात

    आता आपले आवडते कॉम्प्युटर कोर्सेस, जवळच्या MS-CIT केंद्रातजवळच्या MS-CIT केंद्रात

    आता आपले आवडते कॉम्प्युटर कोर्सेस
    Computer courses near me

    आपल्या जवळच्या MS-CIT केंद्रात पुन्हा उपलब्ध

    MS-CIT – डिजिटल कौशल्य हीच भविष्यातील शक्ती
    भविष्यातील उज्वल करियर आणि जॉबसाठी सज्ज व्हा.

    आपण एकविसाव्या शतकातील म्हणजेच डिजिटल युगातील करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने सज्ज होण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यास तयार आहात का?
    मग तुम्ही *MS-CIT* कोर्स शिकायलाच हवा. या कोर्समध्ये २०० पेक्षा अधिक डिजिटल कौशल्ये जाणून घ्या आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये मिळवा.

    Ms-cit

    आता *एकविसाव्या शतकातील डिजिटल कौशल्ये* शिका कोठूनही आणि कधीही कारण *MS-CIT* कोर्स तुमच्यापासून फक्त एक क्लिक दूर आहे.
    • एमकेसीएल ई लर्निंग रेव्होल्यूशन ( *ERA* )
    • ई लर्निंगवर आधारित स्वयं-शिक्षण
    • सरावासाठी भरपूर प्रॅक्टिकल
    • बेसिक कॉम्प्युटर कोर्स माहिती
    • प्रमाणित प्रशिक्षकांकडून शिकण्याची सुविधा
    • शैक्षणिक संवाद, मूल्यांकन आणि सहयोग
    • हा कोर्स आपली सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवतो
    • उच्च गुणवत्तेच्या सचित्र पुस्तकाद्वारे वाचणे आणि समजून घेणे परिणामकारक होते.

    आपण घराजवळ असलेल्या कंप्युटर सेंटरमध्ये, घरी स्मार्टफोनवरून किंवा आपल्या घरी असलेल्या कंप्युटरवरून MS-CIT कोर्स करू शकता.

    MS-CIT कोर्सला नोंदणी करण्यासाठी आजच संपर्क साधा:

    #MSCIT #COMPUTER #COURSES #COMPUTERCOURSES #mkcl #basic #fundamental #career #Aurangabad #Start #open

  • Free test on 11th cet question bank

    Free test on 11th cet question bank

    11th CET Test Series

    MKCL has provided best online test series for the 10th pass students of 2021.

    Which is free and learners can attempt from mobile also and solve from home.

    Learner can also attempt from nearest MS-CIT Center.

    So let’s contact nearest MS-CIT Center for more information and free registration of 11th CET.

    #cet #11th #student #testseries

    11th test series free
    Free CET Test series practice